अत्याचार बळी ठरणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुंटूंबातील सदसयांना अर्थसहाय्य

• शासन निर्णय :-
१. शासन निर्णय क्रमांक-युटीअे-1095/ प्र.क्र.169/मावक-2 दिनांक 24 सप्टेंबर 1997
२. शासन निर्णय क्रमांक-युटीअे-1013/ प्र.क्र.259/सामासु-दिनांक 21 ऑगस्ट 2013
३. समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक यु.टी.अे-2016/ प्र.क्र.298/ सामासु/ दि. 23 डिसेंबर 2016

• उद्दिष्ट:
जातीयतेच्या कारणावरुन अत्याचाराला बळी पडलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती सदस्यांना अर्थ सहाय्य देवून पुर्नवसन करणे.

• लाभाचे स्वरूप
अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या कुटूंबावर /व्यक्तीवर अत्याचार घडल्यास , सदर गुन्हयांची नोंद नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 खाली अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम 1989 खाली झालेली असल्यास गुन्हयांच्या स्वरुपावरुन रु. 60 हजार ते रु. 8.25 लाखा पर्यंत अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते . योजनेच्या लाभासाठी जातीचा दाखला व काही गुन्हयात वैद्यकिय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

• शासन निर्णय डाऊनलोड करा
* शासन निर्णय २०१६

ऑनलाईन योजना