अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयं सहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणेची योजना
    • शासन निर्णय :-
1. महाराष्ट्र शासन, समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय मुंबई-३२ यांचेकडील शासन पत्र क्र. एसटीएस -2011 /  प्र.क्र. 439/ 
         अजाक -1 , दि 06 डिसेंबर 2012
2. महाराष्ट्र शासन, समाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय मुंबई-३२ यांचेकडील शासन पत्र क्र. एसटीएस - 2011/  प्र.क्र. 439/ अजाक -1 दि 06 फेब्रुवारी 2013
3. शासन निर्णय क्र.डीसीटी 2316/ प्र.क्र.133/का.1417 दि 05डिसेंबर 2016.
4. शासन निर्णय क्र. एसटीएस-2016/प्र.क्र.125/ अजाक दि.08 मार्च 2017
• उद्दिष्ट:                                                                         
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शेतक-यांना 100 % अनुदानावर पावर टीलरचा पुरवठा करण्याची योजना बंद करण्यात येवून त्याऐवजी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयं सहायता बचत गटांना 90% अनुदानावर 9 ते 18 अश्व शक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता हि योजना सुरु करण्यात आलेली आहे.                         
• अटी व शर्ती 
1. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे 
रहिवाशी असावेत.
2. स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील 
	असावेत.  
	
3. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु 3.15 लाख ( अक्षरी  रुपये तीन 
	लाख पन्नस हजार फक्त ) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.
	
4. ठरवून दिलेल्या उदिष्टांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड  लाटरी पद्धतीने
 करण्यात येईल.
               
• लाभाचे स्वरूप                                                               
9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी  ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व  ट्रेलर 
    
    • शासन निर्णय डाऊनलोड करा 
    
शासन निर्णय २०१७
    
    अर्जाचा नमुना
    
    अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे