धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वयम योजना

• शासन निर्णय :-
महानगरपालिका , विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १२ वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूतप्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना “ पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना” या योजनेतर्गत भोजन , निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सदर योजना महापालिका विभागीय शहरे आणि जिल्हा स्तरावरील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेऊन शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी लागू राहील
सदर योजनेअंतर्गत शासकीय वस्तीगृह मध्ये प्रवेश घेणे किंवा थेट अनुज्ञेय रकमेचा लाभ घेणे हे दोन पर्याय विद्यार्थ्यांकडे उपलब्ध राहणार आहेत

• सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रमाणे निकष असतील
• विद्यार्थी धनगर समाजातील असावा विद्यार्थ्याने अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील
• विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न रुपये 2.5 लाख पेक्षा जास्त नसावे तसेच केंद्र शासनामार्फत ज्या वेळी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती साठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील
• विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयीकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील
• विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा
• सदर चा विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा
• इयत्ता बारावी मध्ये किमान 60 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या योजनेस पात्र राहतील
• केंद्रशासनाच्या पोस्ट मेट्रीक शिष्यवृत्ती करिता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल तथापि दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही
• एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही
• अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद अखिल भारतीय वैद्यकीय परिषद भारतीय फार्मसी परिषद वास्तुकला परिषद राज्यशासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयात किंवा संस्थेमध्ये व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा
• योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा
• योजनेअंतर्गत लाभ मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती 60 टक्के असणे बंधनकारक राहील तथापि एखाद्या विद्यार्थ्याचे उपस्थितीबाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शहानिशा करून विद्यार्थ्यास देय असलेली रक्कम अदा करण्याबाबत योग्य ते निर्णय घेण्यात येतील
• विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल
• निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील

• शासन निर्णय डाऊनलोड करा
* शासन निर्णय २०१९

ऑनलाईन योजना